Thursday, March 17, 2016

जबाबदारी

नमस्कार..
ही माझी दुसरीच पोस्ट...
मी काय तसा वक्ता किंवा चर्चासत्रात भाग घेणारा वगैरे नव्हे..
चालता बोलता जे बघतो किंवा जे दिसतं , जे जाणवतं ते लिहितोय हळू हळू...


नाव दिलंय "जबाबदारी",
कालच विचार करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक जण जबाबदारी झटकतो.
छोटी गोष्ट असते खरी पण तरीसुद्धा सगळेजण आधी नाही म्हणणार.

आपलं काम झालं कि संपला विषय, अजून पुढे काही आहे का ते नाही विचारणार, हे झालं ऑफिस मधल्या कामाबाबत.
खूप काम आहे तर एखादी नवीन गोष्ट शिकून घेऊन आपण थोडी जबाबदारी घेऊ असं वाटत कस नाही कोणाला ?

माझं तर मत आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर जबाबदारी ओढून घेत नाही तोपर्यंत येणारच नाही तुमचा नंबर.
मग जातील बाकीचे पुढे आणि तुम्ही फक्त करताय कारकुनी !!
पुढे जाऊन मोठा साहेब बनायचंय तर मग त्या मोठ्या माणसांकडून हे शिका कि ते कधी मागे मागे लपून नाही राहिले म्हणून ते पुढे गेलेत आज.

तसाच दुसरा विषय पैशाचा बाबतीत, जर पैसे जमवायचे आहेत तर त्याचा हिशेब ठेवणार कोण हा मोठा प्रश्न!
नको रे बाबा ! पैशाचा मामला आहे ,मी नाही हात लावणार!
हे असतं 70%लोकांच उत्तर, बरोबर कि नाही ?

सामाजिक परिस्थितीत सुद्धा खूप उदाहरणे आहेत,नियम पालन करणं हि एक "जबाबदारी", पुस्तकी नियम पाळलेच पाहिजेत आणि त्यासाठी पोलीस आणि कोर्ट हे आहेतच.
पण त्याचबरोबर, तिकिटाच्या रांगेत नीट उभे राहणे, सार्वजनिक वाहन स्वच्छ ठेवणे.


मित्रहो, तुम्हाला पण येत असतीलच अनुभव असे अनेक,
तुमच्यापैकी काही जण म्हणतील पाण्यात पडल्यावर पोहायला येतं बरोबर.
पण ते सूत्र फक्त पोहण्यापूरतच झालं , इथे या आयुष्यात जगण्याची हि विहीर पण खूप खोल आहे आणि आधी पोहायला शिकून मग विहिरीत उतरणारेच जास्त आहेत!

त्यामुळे आपणच ठरवलं पाहिजे कि जबाबदारी घ्यायची कि येईपर्यंत वाट बघत बसायचं.

आणि सगळ्यात महत्वाचे, एकदा आपण शिकलो कि दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला शिकवायचं, "जबाबदार" लोकांची संख्या वाढली पाहिजे.

4 comments:

  1. khup chhan lihita tumhi sir!!!!

    ReplyDelete
  2. तुझे लेख वास्तविक आणि प्रेरणादायी वाटतात !!!

    ReplyDelete
  3. धन्यवाद !! तुमच्यासोबत होणारे संवाद उपयोगी आले हे लिहिताना !!

    ReplyDelete

एसटी : जीवनवाहिनी

लहानपणी रत्नागिरीला मामाकडे किंवा मावशीकडे जाताना आई एसटी ने घेऊन जायची. तेव्हा , चिपळूण -एकथांबा-रत्नागिरी होती. आणि बाकीच्या गाड्यांचे क...