ज्यांच्या आयुष्यात खूप कष्ट किंवा हाल आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आपल्यामुळे आलं तर आपल्याला पण खूप आनंद होतो.(सध्या तरी इथे आपण म्हणजे "मी" एकटाच आहे)
काल परवाच आलेला अनुभव, मी जेवून रूम वर परत येत होतो. वाटेत एक फुगेवाला दिसला, त्याचा सायकल वर फुगे , खेळणी इत्यादी होतं. त्या सायकलच्या कॅरियरला एक बास्केट आणि त्या बास्केट मध्ये एक लहान मूल!..
तो फुगेवाला म्हणतो, भाऊ 1-2 फुगे घ्या ..
मी म्हणालो , आता फुगे घेऊन कुठे जाऊ ????
तेवढ्यात तो म्हणतो, बाळासाठी दूध विकत घ्यायचं आहे ...
डायरेक्ट बोललो, हे घे 20 रुपये आणि फुगे नको मला !
तो माणूस फुगे विकून पैसे कमवत होता मुलासाठी. आश्चर्य वाटलं मला खूप !..
स्टेशन वर भीक मागणाऱ्यांपेक्षा हे नक्कीच बरं !
पैसे दिले तरी तो म्हणतो फुगे घ्याच . शेवटी कसा बसा ऐकलं त्याने आणि मी फुगे न घेता परत आलो.
रात्री 9.30 वाजता तो माणूस त्याचं काम करत होता, ते पण प्रामाणिकपणाने....
त्याच्या चेहऱ्यावरचा "आनंद " तो वेगळाच !!!
या आधी एकदा ऐरोली स्टेशन वर दोन लहान मुलं दिसलेली. ते भीक च मागत होते, पण कोण लक्ष देत नव्हतं.
माझ्या हातात कधी नाही तो एक बिस्कीट पूडा होता, त्यांचा समोर ठेवल्यावर ते जे काय खुश झालेत. ते दोघे पण खुश आणि मी पण !!...
पण तेव्हा बाकीचा माणसांनी माझ्याकडे असं बघितलं कि मी खूप काहीतरी चुकीचं केलं !!!.....काय कळलंच नाही सगळे असे का बघतात ते?....पण मला फक्त ते दोघे आनंदित दिसत होते.....
मित्रांनो, जमेल तशी मदत करत राहू.
तुम्ही पण केलीच असेल अशी मदत, "आनंद" द्या आणि "आनंदी" व्हा !!!.....