Tuesday, February 7, 2017

इंजिनीयरिंग

इंजिनियरिंग हा विषय सुरुवात कुठून करायचा आणि संपवायचा कुठे ...काय कळणार कसं ???...तीन वर्षात झालेलं सगळं लिहायच म्हणजे वेळ आणि शब्द पुरणार नाहीत..तरीपण जे आठवेल तसं थोडं थोडं लिहितो....

२० कॉलेज ची यादी दिलेली , रात्री १२ वाजले तरी काय Allotment चा पत्ता नाही. शेवटी रात्री २ वाजता समजलं, "डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कराड". तिकडच्या परिसराची माहिती नाही, पण जाणं तर भागच होतं.

.......कॉलेज सुरु झालेलं होतं, तिकडे पण काही कराडचे तर काही कोल्हापूर, साताऱ्यातील मित्र भेटले होते. आणि शिवाय मुंबईहून आलेल्यांची वेगळीच स्टाईल. मुलं-मुली मिळून 21 ची batch "डिप्लोमा होल्डर्स" ची..मित्रांची फौज च मोठी!!...या सगळ्यांबरोबर मजा करत, कधी थोडे भांडत,  इंजिनियरिंग एन्जॉय केलं.!!
वाद झाले, मतभेद झाले....पण इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला सगळे भेटलेलो ते आजही आठवणारच !!...शेवटी आपला तर फंडा क्लियर आहे..मैत्रीत लांब गेला असाल तरी, जेव्हा चांगले मित्र होतात ते आठवा... नक्कीच परत भेटाल !!!

ऍडमिशनच्या दिवशी भेटला एक मुंबईचा मित्र "तन्मय", कायमचं राहायच्या तयारीत आलेला. २ मोठ्या बॅग,आणि त्याच्या बाबांसोबत एकटाच बसलेला सकाळपासून. पहिल्याच दिवशी भेट झाली, मैत्री झाली तिथेच. मग बाकी पुढे ऍडमिशन, रूम,lectures सगळीकडे मदत झाली एकमेकाला...घरापासून लांब राहिलेला नाही त्यामुळे Adjust करायला थोडा वेळ गेला त्याला, पण नंतर झाला "Hostel Wala".
पहिला आठवडाभर डिप्लोमा ला काय मजा केली हे बोलण्यातच अक्खा दिवस जायचा..त्याचं मात्र एकच असायचं, 'मी कसा नालासोपारा वरून मुंबई सेंट्रल पर्यँत लोकल ने जात होतो' !! . पुढे नंतर रूमची साफसफाई आणि सकाळी नाश्ता करून lecture ला जाणं, ते सगळं रुटीन चालू झालं. पूर्ण सेमिस्टर सब'मिशन' न करता शेवटचे ४-५ दिवस युद्धपातळीवर काम करायचं हे त्याने ठरवलंच होतं जणू☺...
पेपरच्या अभ्यासाला हा टॉपिक वाचू कि तो वाचू ??..इत्यादी प्रश्न...फायनली Imp टॉपिक tick करून दिले की अभ्यासाला सुरुवात.

हुपरी ( जि.कोल्हापूर) चा एक मुलगा होता आमच्या batch मध्ये, आणि रूममेट सुद्धा.."हँडसम हेमंत"...पहिल्या lecture पासून आम्ही तिघे lecture ला जाताना आणि येताना एकत्र...justin bieber च्या songs चा चाहता....इंग्लिश बोलायची एक वेगळीच स्टाईल.."hello Oms...Hows You ??" एकदम फॉरेन accent... दिसायला पण फॉरेनर आणि इंग्लिश पण...

आजरा(जि. कोल्हापूर) मधून आलेला "वैभव".."काय करायलायस" हे ज्याच्याकडून ऐकलं तो हाच पहिला मित्र☺...पहिल्या दिवशी भेटलो. नंतर अगदी फायनल च्या प्रोजेक्ट पर्यँत आम्ही एकाच batch मध्ये..या पोराला गादीवर झोपलं तर झोप येत नाही, हे ऐकून पहिल्या दिवशी मीच "गार" झालो होतो..

अंतवडी( कराड जवळच) मधून आलेला "विशाल"...भरपूर बोलका, सगळ्यांना हसवणारा, बोलत नसेल त्यालाही बोलायला लावणारा. Sense of Humour वाला मित्र. Second Year of Engineering कायम लक्षात राहीलं ते leture मधल्या मस्ती मुळेच..एकदा न्यायनीत सरांच्या lecture ला त्यांनी बाहेर जायला सांगितलं होतं, तेव्हाही आम्हीच होतो. 2 lecture च्या मधल्या वेळेत वर्गात खेळताना पकडलं होतं सरांनी. तसं प्रत्येक lecture ला उभं राहणं रोजचं झालं होतं...एखादा जोक सांगून side च्या ४-५ जणांना हसवायचं आणि आपण गप्प बसायचं !!...2nd year ला रुम मध्ये "आयुष्यावर बोलू काही" ची मैफिल च भरवत होतो आम्ही..दिवसभर तेच.!!

सोलापूर चा "अतुल" (अतल्या) हा पण आमच्या lecture मधल्या Crimes चा पार्टनर !!..सोलापुरी भाषेचा अभ्यासच झाला अतुल सोबत राहून. "शांत बसा•••" हा डायलॉग अजून पण आठवतो. मित्रांमध्ये लवकर mix होणारा अतल्या.

कराड चा रविंद्र(रव्या) , अगदी पहिल्या दिवसापासून गॉगल आणि स्प्लेंडर हीच त्याची ओळख बनली. तेव्हा जरा बारीक होता.. पण नंतर सिंघम रिलीज झाला आणि त्याची पण बॉडी वाढली.. "सिंघम" याच नावाने हाक मारतो मी अजून पण त्याला...आणि तो मला बोलतो "पंडित" .. पटापट डिसीजन आणि कमीत कमी चर्चा करून "चला, ठरलं मग" हा डायलॉग फिक्स असणार...कुठे इकडे तिकडे काही बघण्यासारखं दिसलं कि आमचं लगेच लक्ष जाणार आणि लगेच इशारा एकमेकाला..!! हाहा !!

भिकवडी चा "राहुल" , धिप्पाड !!..उचलून फेकून देईल माझ्या सारख्याला..त्याचा गावाला गेलेलो एकदा, मला पोहायला येत नसतानाही विहिरीत उतरलो. खाली बुडत चाललेलो, फक्त हात वर होते निशाण फडकावल्यासारखे, डुबकी मारून राहुल्याने उचलून वर आणलं डायरेक्ट..!!!इंजिनियरिंग मध्ये लेक्चर, अभ्यास, रूम वरच्या गप्पा सगळ्या चालूच... नंतर सेन्डऑफ ला राहुल्या बरोबर पंजा लावायचं dare दिलेलं मला..आणि तेव्हा तो हरला (मुद्दामून)

या आमच्या ग्रुप मध्ये 1-2  शांत स्वभावाची पोरं पण होतीच, घरून ये जा करत असल्यामुळे फक्त कॉलेजातच भेट होत होती. त्यामुळे प्रॅक्टिकलला होणाऱ्या अभ्यासाच्या आणि इतर गप्पा गोष्टी तेवढ्यापुरतीच आमची गाठभेट. म्हणजे खरं सांगायचं तर हक्काने चिडवायला मिळणारा 'अमोल' आणि घरच्या शेतीमुळे, शेतीबद्दल भरपूर माहिती असणारा 'सचिन' हेच ते दोघे.

डहाणू(मुंबई जवळ) चा "धनंजय" ...टोपण नाव "DJ".....केळवा बीच ..डहाणू, पालघर चा  कोळी बांधव हीच त्याची ओळख..
DJ हॉस्टेल वर राहायचा, तिकडेच कधी भेट झाली तर होत होती. नाहीतर मग फक्त लेक्चरलाच. एकदा चला रे केळवा बीच ला, हे तो खूप वेळा बोलला पण ते काय शक्य झालं नाही.

आता या सगळ्यांत मुंबईची पोरं (मुंबईकर) राहिलीच..

शांत किंवा अबोल स्वभाव आणि खेळाडू हे समीकरण असतं हे मला माहीतच नव्हतं. ठाण्याचा स्वप्नील आम्हाला भेटला तो असाच, खूप कमी बोलणारा आणि एकदम शांत. जेव्हा तो म्हणाला की डिप्लोमा कॉलेज क्रिकेट टीम मध्ये खेळलोय तेव्हा अजिबात खेळता न येणार्या मी सुद्धा त्याला अगदी "कोच" असल्यासारखं विचारलेलं , "खरंच तू क्रिकेट खेळतोस ?"...नंतर सलग 3 वर्षे कॉलेज टीम मध्ये खेळून match जिंकवून पण दिल्यात त्याने. #Spinner_SP

एकदम जुगाडु, मुंबई स्टाईल मस्करी करणारा, फ़ुटबॉल आणि बॉक्स क्रिकेटचा खेळाडू "मंग्या"(मंगेश). अभ्यास करताना फास्ट grasping आणि परीक्षेत कॉपी करताना फक्त उत्तराच्या दोन ओळी दिसल्या तरी 10 ओळी लिहिणारा मंग्या.
"हुशारी" म्हणजे काय ते मंग्याकडून शिकण्यासारखं होतं....

"लालबाग परळ" हा म्हणजे "आपला एरिया" , असं चालता बोलता तिथल्या लोकांच्या बोलण्यात असतं....
तसेच दोन जण आमच्या ग्रुप मध्ये...जिकडे जातील तिकडे मुंबईचं कौतुक..( आता मला पण समजलंय "ते" कौतुक #Being_Mumbaikar)...कराड मध्ये एखाद्या वरातीत DJ वर गाणं लागलं तरी "तुषार' म्हणणार, "अरे जुनं झालं रे..2-3 महिन्यांपूर्वी नाचलो होतो या गाण्यावर".. ....कोणी नवीन जीन्स घेतली की लगेच ,"आपल्या एरियात ये रे, एक सो एक जीन्स घेऊन देतो"....याऊलट "संकेत" तसा शांत पण मुंबईची फॅशन फॉलो करणारा...तेव्हा लेक्चरला स्लीपर घालून आणि केस "स्पाईक" करून जाणाऱ्या मुंबई गॅंग चा संकेत लिडर च !!

मंग्या, तुषार आणि संकेत एकाच डिप्लोमा कॉलेज चे विद्यार्थी.. त्यांचाच कॉलेजचा पण पुढच्या राऊंड ला कॉलेज मध्ये एन्ट्री घेतलेला "रमाकांत"(रमा)...बांद्रा म्हणलं कि फॅशन आलीच.. संकेत सारखाच हा पण फॅशनवाला. अर्जुन कपूर चा फॅन, त्याच्यासारखी हेयरस्टाईल पाहिजे त्याला कायम. क्रिकेटचं वेड यालासुद्धा...एका match ला धावत जाऊन catch पकडलेला "रमा" ने...सगळ्या पोरी पागल!!...कॅन्टीन मध्ये खायला जाताना आम्ही मेम्बर फिक्स..अभ्यास करताना दुसरं काहीतरी timepass करायची वाईट सवय आहे मला, ती फायनली त्याला पण लागलीच😝 !!

आता राहिला एक जण , हा विद्यार्थी सगळ्यात शेवटच्या राउंडला कॉलेज ला आला..ग्रुप मध्ये रुळायला थोडा वेळ गेला.  सेमिस्टरचं फाईल सबमिशन जवळ येत होतं, मी आणि अजून एक मित्र ,दोघे आमचं जेवढं काही लिहून पूर्ण झालं होतं ते घेऊन त्याच्यापुढे गेलो.."जरा शायनिंग फुकटची" !!....फाईल लागल्या तर सांग रे...😎👻तर तो बोलतो झालं सगळं लिहून😱😵😵नंतर चांगली मैत्री झाली, 3rd yr आणि last yr चे सगळे पेपर एकत्र अभ्यास करून सोडवले. लगेच राग येणारा पण मानाने चांगला "सागर"...परखड मत नोंदवणे, समोरच्याला काय वाटेल ते राहील बाजूला.
रूम मधला टापटीप पणा, रोज केर काढणं आणि देवाला दिवा लावणं या सवयी त्याने कधीच सोडल्या नाहीत.

इंजिनियरिंग म्हणलं आणि शिवाय इलेक्ट्रॉनिक्स म्हणलं कि ग्रुप मध्ये मुली आल्याच...थोडंसं लिहितोच आता त्यांच्याबद्दल....
कोल्हापूरची 'स्पेशल' भाषा घेऊन आलेली आणि  सुरवातीला जिच्या फाईल मधून बघून आम्ही लिहीत होतो ती "अस्मिता"..
मुंबईत राहिलेली पण तरीही कमी बोलणारी "गौरी" उर्फ गौरा....
डिप्लोमा ला एका कॉलेज मध्ये असूनपण माझ्याशी एकही शब्द न बोललेली, 3rd year ला अचानक भरपूर मार्क मिळवून प्रसिद्ध झालेली, छोटीशी "शरयू".....
एकदम innocent, intelligent, आयुषमान ची फॅन "शितल"..
लेडी डॉन आणि choreographer"शकुंतला" ; चिडणाऱ्या सागर बरोबर कोणत्याही विषयावर भांडणारी , assignment लिहिणारी आणि आम्हाला आणून देणारी friend..पूर्ण डिप्लोमा ग्रुप ची "लॅपटॉप" friend. डॉन म्हणलोय आत्ता , पण आता मेसेज वर धमकी येणार मला.🙁
डान्सर आणि मुंबईकर स्टाईल असणारी "संचिता"....

फक्त मित्रमैत्रिणींची माहितीच लिहिली, आठवून आठवून लिहिलं तर पुस्तक होईल एक...इंजिनियरिंग म्हणजे एक "टर्निंग पॉईंट"च...खूप काही शिकायला मिळतंच आणि दुसर्यांना बघून आपण आपल्यात बदल करतो..कधी ते नंतर उपयोगी पडतात तर काही वेळेला तेव्हा लगेच...

या मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा, बर्थडे पार्टी, पिकनिक, प्रत्येकाच्या घरी जाऊन केलेली मजा, कॉलेज मधला टाईमपास,भांडणं- वाद; सगळं सगळं लक्षात राहील पण "इंजिनियरिंग" काय पुन्हा येणार नाही....Alumni ला भेटलो तेव्हाच वाटलं लिहावंसं....ते आत्ता राहुलच्या लग्नात परत भेटल्यावर लिहून काढलं...
तेव्हाचे जोक्स अजून पण आठवतात, तेच पून्हा पून्हा नव्याने केले जातात...पण आता ते "इंजिनियरिंग" नाही, आता फक्त आठवणी आणि भेटीगाठी .

Miss You All !!...Missing Engineering !!!

एसटी : जीवनवाहिनी

लहानपणी रत्नागिरीला मामाकडे किंवा मावशीकडे जाताना आई एसटी ने घेऊन जायची. तेव्हा , चिपळूण -एकथांबा-रत्नागिरी होती. आणि बाकीच्या गाड्यांचे क...