Thursday, August 25, 2016

व्यक्ती तितक्या प्रकृती !

शीर्षक दिलंय "व्यक्ती तितक्या प्रकृती "...पण मी काय सारं जग फिरून आलोय आणि लिहितोय वगैरे असं काही नाही....माझेच जवळचे मित्र आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव..यावरून हे असं काहीतरी लिहावंसं वाटलं
मित्र-1
माझा जिवलग मित्र..नाव जाहीर करत नाही. उद्या जर माझा ब्लॉग प्रसिद्ध झाला तर उगाच तो पण प्रसिद्ध व्हायचा..
.कोणत्या गोष्टीवर कधी एकमेकाला टोमणा मारू ते सांगता येत नाही...टोमणा हे खूपच चांगलं बोललो, तसं आम्ही खूप काय काय बोलतो एकमेकाला..
शाळेत असताना वक्तशीरपणे न चुकता माझ्या घरी यायचा , आणि मी तेव्हा आवरत असायचो..तरीपण तो वाट पाहत राहायचा..
मागे 2-3 वर्षांपूर्वी काही कारणासाठी , तो असाच वाट पाहत थांबला होता, तब्बल 5 तास !!!
आमचं एकमत कोणत्या गोष्टीवर होत नाही , पण आजपर्यंत कधी भांडण पण झालं नाही..
माझा वाहन प्रशिक्षक पण तोच, आमच्या मित्र परिवाराचा वाहनचालक पण तोच!!
एकदम शांत स्वभावाचा, तसेच वाहन या विषयात विशेष आवड आणि त्यात पदव्युत्तर शिक्षण पण!!.
मी आळशी, तो वक्तशीर
मी फक्त प्रवासी, तो वाहन चालक
मित्र-2
कोणत्या गोष्टीवर टीका ऐकायची असेल तर यांना विचारा..प्रत्येक गोष्टीत negative बाजू शोधून दाखवणार हा माझा मित्र.
ना कोणत्या राजकीय पक्षाचा follower, ना कोणत्या नटाचा किंवा नटीचा फॅन, ना कोणतं आवडतं पुस्तक...
हे हे मला खूप आवडलं, असं खूप कमी वेळा ऐकलय मी त्याच्याकडून..
मित्रपरिवारातला संगणक तज्ज्ञ माणूस. डिजिटल साक्षरता प्रमाण 100%
शाळेत असताना मराठीच्या पेपर ला आधी निबंधाने सुरुवात करणारा, आणि संस्कृतचं बाह्य भाषांतर जमणारा एकटाच इसम !
आम्ही कोणत्या गोष्टीत वाद घातला नाही , असं झालंच नाही.  आमच्या वादाचा बाकीच्यांना त्रास !! पण आम्ही वाद घालतच राहतो.
मित्र-3
आधी सांगितलं तो मित्र वक्तशीर, पण हा वेळेच्या खूपच आधी धावणारा माणूस. दैनंदिन वेळापत्रक कसं बनवावं ते मी त्याच्याकडून शिकणार आहे. पण ते बनवायला पण मी अजून वेळ शोधतोय.
कोणत्याही कामाला जाताना, यायचं आणि जायचं आरक्षण करून जातो हा, म्हणजे कार्यक्रम ठरलेलाच असतो.
हे कसं काय जमतं त्याला, ते अजून कळलेलं नाही मला.
एक दिवस आजारी होता म्हणून घरी आरामाला आला होता, तेव्हा पण त्याच्याकडे परत जायचं आरक्षण होतं, अजबच !!!
आमच्या सहलीचा व्यवस्थापक पण हाच असतो , अगदी निर्विवाद !!
सुतासारखा सरळ असं म्हणतो आम्ही त्याला.
कोणत्याही गोष्टीत रिस्क घेणे नाही.
कॉलेज ला attendance पण ९०% च्या वर.
प्रत्येक गोष्टीत नको म्हणणार, वडापाव खाल्ला तर पोट दुखतं, ice cream खाल्लं तर सर्दी होते..प्रत्येक वेळी अडचण !
असो, माझ्यासारख्या अनियमित वेळापत्रक असणाऱ्याला असा मित्र मिळाला हे मी माझं भाग्य समजतो.
मित्र-4
जसा एक चालक, एक व्यवस्थापक..तसा एक पर्यटक पण असावा मित्रपरिवारात. माझ पण आहे असा एक मित्र.
कधी सहलीला जायचं ठरत असेल तर , यांचं मत अंतिम !!
सहलीला गेल्यावर कॅमेरामन ची भूमिका बजावणारा मित्र. काही epic गोष्टी याच्याकडेच असतात.
जेव्हा भेटायचं ठरेल तेव्हा लगेच हजर, लांब राहत असून पण लगेच हो म्हणणार भेटायला..चांगली सवय..!!
बोलता बोलता punch मारायची सवय आहे याला.
तसा जास्त बडबड करत नाही , पण एकच punch जोरात असतो.
महत्वाचं म्हणजे माझा ब्लॉग सगळ्यात आधी वाचणारा माझा मित्र !!
मित्र-5
अंगाने बारीक पण हाडाचा मेकॅनिकल इंजिनीयर..
आजारी असताना पण रोज 2 तास प्रवास करून ऑफिसात नोकरी केली. आता mtech पूर्ण करून परत नोकरी मिळवेल, माझ्या आधी मास्टर्स पूर्ण करतो की काय कोणास ठाऊक ?
खेळाडू मित्र...बुद्धिबळ आणि क्रिकेट हे आवडते खेळ.
जरा काही बोललं कोणी तर लगेच चिडणारा माझा मित्र पण माझ्यावर कधी चिडला नाही आजपर्यंत.
वेगाने गाडी चालवण्याची आवड...अगदी गाडी झोपवून चालवली होती एकदा , आणि मी मागे होतो, अविस्मरणीय!
पत्ते खेळण्यात पण एक्स्पर्ट.. excitement वरच्या  लेव्हल ची..
रात्री जागून tv बघण्याची सवय...हे बाकी आवडलं आपल्याला...
मित्र 6
10 वी पर्यंत , सकाळच्या वेळी माझ्या घरचा landline वाजला कि सगळ्यांना कळायचं, कोणाचा फोन  असणार ते. हाच तो !!...हा धडा वाचू कि तो धडा वाचू ??
10 वी त एक मार्क त्याच्यापेक्षा जास्त मिळाला होता तेव्हा मला बोर्डात आल्यासारखं वाटलं होतं.
तेव्हापासून तो त्याच्या आईला घाबरतो, तो अजूनपर्यंत तेवढाच घाबरतो.
फोटोग्राफीचं व्यसन लागलय त्याला आता..
कॉलेजात प्रोफेसर पण बनलाय..
सहलीला जायला हो म्हणणार आणि आयत्यावेळेला नाही म्हणणार, हा त्याचा विशेष गुण !
बांधवगड नामक परिसरात जाण्याचा रेकॉर्ड करणार आता ...
10वी झाली, सगळे जण आपापल्या शैक्षणिक  मार्गाला लागले. आता तर नोकरी सुद्धा ...पण अजूनही
एक वार्षिक सहल आणि सणासुदीला चिपळूण ला भेटणं हे नियमित चालू आहे.
कोणी शांत तर कोणी बडबड करणारा, कोणी मराठी चित्रपट चाहता तर कोणी हॉलिवूड चा चाहता..
कोणाला गर्दीत फिरायला आवडतं तर एखाद्याला शांतता पाहिजे..एखादा लाजरा तर दुसरा बिनधास्त...
वेगळ्या स्वभावाचे असतात तरी पण एकत्र राहतात, ते म्हणजे "मित्र"
गोष्टी नव्या कितीही चांगल्या असल्या तरी , मित्र जुनेच चांगले असतात !!

26 comments:

  1. उत्कृष्ट लेखन।
    सहज सोपे विचार आणि ते शब्दात मांडायची कलाही तितकीच प्रभावी।
    तुम्ही असेच लेख लिहत राहावे आणि आमचे मन ते वाचून तृप्त व्हावे हीच इच्छा।

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व जास्त आहे...मार्गदर्शन करत राहा..नवीन विषय सुचवा , जसा हा सुचवला होता !!!

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Kadak zo
    tuch to khara Mitra
    Lihit raha asach susat.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की लिहिणार, स्टायलिश अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!!...

      Delete
  4. #रडवलंस_मित्रा 😢
    पण चालूदे जोरात! मस्त लिहितोस 🤘

    ReplyDelete
    Replies
    1. हॅशटॅग चा मराठीमध्ये पण योग्य वापर..!!! धन्यवाद !!!

      Delete
    2. हॅशटॅग चा मराठीमध्ये पण योग्य वापर..!!! धन्यवाद !!!

      Delete
  5. छान वाटलं वाचून!

    ReplyDelete
    Replies
    1. पुढच्या ब्लॉग मध्ये तुमचा नंबर !!😁

      Delete
    2. पुढच्या ब्लॉग मध्ये तुमचा नंबर !!😁

      Delete
  6. Aaichya gavat mala vatal amchyabaddal lihalas...

    ReplyDelete
  7. lihito re bhawa...!!..hostel life !!!

    ReplyDelete
  8. lihito re bhawa...!!..hostel life !!!

    ReplyDelete
  9. उत्तम वर्णन केलंयस सगळ्यांचं !!! मी पण प्रयत्न करतो एका जुन्या मित्राविषयी लिहायचा ... मला काही तुझ्यासारखं लिहिता येत नाही पण बघ जमतंय का...
    एक जिवलग मित्र .... !!!
    आमच्या ग्रुपमधील एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र !!!बडबड करण्यात आणि टोमणेबाजीत अव्वल...
    ह्याला आजतागायत कधी नावाने हाक मारलेली आठवत नाही.... वडापाव ,चहा आणि एस. टी. ची ह्याला विशेष आवड ... टी .वी . वरील सगळ्या चॅनेल्स ची माहिती ठेवण्याची अजब कला अवगत केलीय ह्याने... मित्रांबरोबर जायला कधीही तयार... वेळापत्रकाप्रमाणे वागणं कधी जमलंच नाही ह्याला... सहलीच्या वेळी कायम मागच्या सीटवर बसणारा इसम ... कॅमेरा दिसला कि लगेच पोझ देणार , पण स्वतःवर फोटो काढायची वेळ आली की सरळ नाही म्हणून सांगणार... ह्याचं पदव्युत्तर शिक्षण हा चर्चेचा विषय बनलाय सध्या ... जिकडे जाईल तिकडे मित्र बनवणारा आणि सगळ्यांच्या तितकाच जवळचा असा हा माझा मित्र...

    ReplyDelete
    Replies
    1. "June mitra" he "changle" astat mhanun "changla"ch lihilas junya mitrabaddal #Tomna

      Delete
    2. "June mitra" he "changle" astat mhanun "changla"ch lihilas junya mitrabaddal #Tomna

      Delete
  10. खूप छान , वाचल्या नंतर सगळे मित्र ड़ोळ्यासमोर आले.

    ReplyDelete
  11. मी तुमच्या कोणत्याही मित्राला ओळखत नाही, किंबहुना मी तुम्हाला सुद्धा व्यक्तीश: ओळखत नाही.
    पण आत्ता हा ब्लॉग वाचून ही मंडळी माझ्या घरचेच कोणीतरी असल्याचा आभास झाला.

    उत्कृष्ट लेखनशैली! लिहीते रहा!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !!..मनापासून आभार !!..

      लिहीत राहूया आणि वाचत राहूया !!

      Delete

एसटी : जीवनवाहिनी

लहानपणी रत्नागिरीला मामाकडे किंवा मावशीकडे जाताना आई एसटी ने घेऊन जायची. तेव्हा , चिपळूण -एकथांबा-रत्नागिरी होती. आणि बाकीच्या गाड्यांचे क...