हा माझा पहिलाच ब्लॉग !.शीर्षक काय द्यावे हा पण एक प्रश्न ..थोडक्यात नवीन "अनुभव ". त्यामुळे तेच नाव दिले .
कोणी म्हणाले की अनुभव येतात ,पण मी म्हणतो अनुभव घ्यायला शिका. छोटया छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात .
ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात करीत नाही ,त्या कधीतरी खास वेळ काढून करा. मित्रहो! बघा नक्कीच फरक पडेल .
नेहमी मॉल मध्ये खरेदी करणे पसंत करीत असाल तर एकदा रस्त्यावर बाजारात फिरून बघा .बाजारात पाव किलो भाजीसाठी घासाघीस,गर्दीत होणारी गडबड,हिंदी -मराठीची सरमिसळ,सामान उचलून चालत जाणे..यासारख्या गोष्टी तुम्हाला प्रथम त्रासदायक वाटतील.पण सतत आरामशीर जीवनापेक्षा असे छोटे मोठे त्रास झाले पाहिजेत .आजकाल प्रत्येकाला परिपूर्ण बनायचे असते ,तर मग हे केलेच पाहिजे . हे अनुभव तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कसे राहावे ते शिकवतील.
अजून खूप उदाहरण आहेत ,रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठत असाल;तर एक दिवस सूर्योदय बघा...खरच प्रसन्न असते सकाळ ते अनुभवाल.
विद्यार्थी आहात तर बँक,रेल्वे स्टेशन येथील कामे स्वतःहून समजून घ्या . तेथे येणारे अनुभव म्हणजे एक प्रकारची शाळाच !
एकदा तरी टपरीवर चहा पिउन बघा , फाइव स्टार हॉटेल मध्ये पण मिळणार नाही असा चहा .
एकदा तरी वडापाव, पाणी-पुरी रस्त्यावर खाऊन बघा . भले नसेल ती आरोग्यदायक , पण खाल तेव्हा तुम्हाला कळेल की , चव तर चांगली आहेच पण भारतात खूप लोकांचं हे जेवण आहे. त्याचा अनुभव पण आपल्याला असायला हवा
आता तुम्ही म्हणाल की , हे काय शिक्षण आहे का ? हो ! हेच खरे शिक्षण आहे . अनुभवातून माणूस शिकतो ते कधी विसरत नाही .
अनुभवातून आलेले शहाणपण ! असे म्हणतात . म्हणजे अनुभव माणसाला शहाणा करतो हे तर नक्की झालं . विद्यार्थीदशेत वसतिगृहात राहणारे नक्कीच खूप अनुभवी असतात . खानावळीतले नावडते जेवण , कॉलेजला जाताना झालेली गडबड , सगळ्यांचीच आवरायची घाई , जपून पैसे वापरणं , स्वतःची कामे स्वतः करणे , हे सगळे अनुभव म्हणजे येणाऱ्या आयुष्याची एक "नेट practice "च .
मित्रहो , बघा मी म्हणतो तसं करून … "आयुष्यातला एक दिवस जरी नेहमीपेक्षा वेगळं जगलात ,तर आयुष्य चार दिवसांनी वाढतं "(डायलॉग आहे ), मी कोणी वक्ता नव्हे . मी पण एक अनुभवातून शिकणारा माणूस !!!